अहमदनगर । इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करा अन्यथा...

समितीला पुरावे न सापडणे हे दुर्दैवी असून यामागे राजकीय दबाव, झुंडशाही असल्याचा आरोप गवांदे यांनी केला आहे

अहमदनगर । प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यासाठी पीसीपीएनडिटी कायद्याचा आधार घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात येत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला. समितीला पुरावे न सापडणे हे दुर्दैवी असून यामागे राजकीय दबाव, झुंडशाही असल्याचा आरोप गवांदे यांनी केला आहे. जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे कल्पना देऊनही डॉ. मुरंबीकर आज अंनिस कार्यकर्त्यांचे निवेदन घ्यायला अनुपस्थित होते. इंदोरीकर महाराज यांची वादग्रस्त क्लिप सायबर पोलिसांना सापडत नसली तरी ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. या वक्तव्याचे धर्मग्रंथांच्या आधारे महाराज समर्थन करणारे व्हिडीओ व्हायरल झालेले असताना पीसीपीएनडिटी चे प्रमुख डॉ प्रदीप मुरंबीकर का कारवाई करत नाहीत असा प्रश्न अंनिस ने उपस्थित केला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies