अहमदनगर | जिल्हा क्रीडा संकुलातील बेकायदेशीर इमारत पाडण्यास सुरुवात

महानगर पालिकेची धडक कारवाई

अहमदनगर | शहरातील वाडीया पार्क मैदानावर बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात मंजूर आराखड्या नियमापेक्षा अधिक बांधण्यात आलेले नियमबाह्य दोन इमारती पाडण्याचे काम आज रविवारी सकाळीच सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू केली आहे. जिल्हा क्रीडा संकुल तत्कालिन नगरपालिका असताना झाले होते. वाडीयापार्क मैदानात विकास कामामार्फत उभारण्यात आलेले जिल्हा क्रीडा संकुल नेहमीच वादात राहिले आहे.

कामाचा दर्जा, क्रीडा सुविधा, दिरंगाई या बरोबरच मंजूर आराखड्यापेक्षा अनधिकृतपणे बांधण्यात आलेली बांधकामे यामुळे क्रीडा संकुल नेहमीच चर्चेत राहिले आहे. पालिकेच्या महासभेत हा विषय होऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय झाला होता. पुढे 2013 साली औरंगाबाद खंडपीठाने बांधकाम पाडण्याचा निर्णय देत नाशिक विभागीय आयुक्तांना तसे आदेश दिले होते. अखेर आज सकाळी अतिक्रमित असलेली इमारत अ आणि ब पाडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies