राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘विधानसभा निवडणुका पुढे ढकला’

पूरस्थितीमुळे विधानसभा निवडणुक पुढे ढकलावी - नारायण राणे

सिंधुदुर्ग । राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारने पूरग्रस्त भागाची पाहणी करून निवडणुका पुढे ढकलाव्यात की नाही याचा विचार करावा, असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सरकारने सर्व राजकीय पक्षांचे मत घेऊन निवडणुकांबाबत निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.

नारायण राणे म्हणाले की, ‘सध्याची पूरपरिस्थिती पाहता सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करायला हवा. राज्यातील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थिती नंतर तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी तरी लागेल. राज्याच्या निवडणुकीचा कालावधी हा सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये असणार आहे. यावेळी पाऊसही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यात विस्थापित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्य देऊन नंतर राज्याचा विधानसभा निवडणुकीबाबत विचाविनिमय व्हावा. शक्यता निवडणुका पुढे ढकलणे योग्य ठरेल.’AM News Developed by Kalavati Technologies