ड्रग्स प्रकरणात दीपिका-श्रद्धा-सारा यांचं नाव आल्यानंतर रवीना म्हणाली 'सफाई का समय आ गया है'

ड्रग्स प्रकरणावरून अनेक मोठमोठ्या कलाकरांच्या नावाचे खुलासे होत असल्याने, बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून, एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर ड्रग्स प्रकरणावरून रोजच नव-नवीन खुलासे होत आहे. ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडमधील दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा दिग्गज कलाकरांचे नावे समोर येत आहे. दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रवीना टंडन हिने सुद्धा उडी मारली आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रवीनानं केली आहे.

रवीना ट्विट करत सांगितले आहे की, 'आता सफाईचा वेळ आला आहे. स्वागत आहे! यामुळे आमच्या पुढच्या पिढीला याचा नक्कीच फायदा होणार आहे. येथून सुरूवात करा त्यानंतर अन्य क्षेत्राचीही चौकशी करा. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्स यांना शिक्षा द्या. श्रीमंत लोकं गरीबांचे आयुष्य खराब करीत आहे.' असे ट्विट रवीनानं केलं आहे. दरम्यान सुशांतसिंह तसेच ड्रग्स प्रकरणात नव-नवीन खुलासे होत आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविक, सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण अशा दिग्गज कलाकरांची नावे या प्रकरणात आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.AM News Developed by Kalavati Technologies