अखेर महिनाभरानंतर आश्विनी पाटील परतल्या मायदेशी

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे चीनमध्ये होत्या अडकुन

दिल्ली | चीनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक आज सकाळी 10:30 वाजता मायदेशी परतले आहे. त्यात साताऱ्याच्या अश्विनी पाटील सुद्धा मायदेशी परतल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे चीनमध्ये 119 नागरिक अडकुन पडले होते. भारतात परतण्यासाठी त्यांनी सरकारकडे मदतीचा हाथ मागितला होता त्यानुसार 10 फेब्रुवारी पासून त्यांच्या सुटकेसाठी सरकारने अथक प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान आज सकाळी आश्विनी पाटील यांच्यासह 119 नागरिक दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले आहेत. आपल्या मातृभुमीत परतल्यावर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 

भारतात परतल्यावर आता त्यांना पुढील तपासणीसाठी दिल्ली येथे 15 दिवस ठेवल्या जाणार आहेत. तपासणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना सुखरूप आपल्या घरी पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान आपली मुलगी सुखरूप भारतात परतल्यानंतर आश्विनीच्या आई वडिलांना अश्रु अनावर झाले आहे. माध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.  आमची मुलगी माध्यमांनी फोडलेल्या वाच्यामुळे तसेच सरकारच्या अथक प्रयत्नामुळे मायदेशी परतली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खुप खुप आभार मानते  असं म्हणत  आश्विनी पाटीलच्या आई वडीलांनी  माध्यमांचे तसेच सरकारचे आभार मानले आहेत. AM News Developed by Kalavati Technologies