हिंगोलीत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही भरते पालामध्ये शाळा, आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार? विद्यार्थ्यांचा सवाल

'सारे शिकूया पुढे जाऊया' असे नारे लगावणारे शासन या मुलांपर्यंत अजूनही पोहोचू शकले नाही ही शोकांतिकाच आहे

हिंगोली | भारताला स्वतंत्र होऊन आज 73 वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही स्वातंत्र्य म्हणजे काय अनेक मुलांना माहित नाही. याचे कारण म्हणजे अजूनही त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचू शकली नाही. अशाच शाळा बाहय मुलांची पालामधील एक शाळा हिंगोलीत सुरु आहे. पालामध्ये भरणाऱ्या या शाळेतील विद्यार्थी आता स्वातंत्र्याचा खरा अर्थ विचारात आहेत.

शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असला आणि शाळाबाह्य मुलांना घरपोच जाऊन सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधीचा चुराडा होत असला तरी अजूनही हजारो मुले शिक्षणापासून वंचितच आहेत. ही बातमी कुठल्याही खेड्यापाड्यातली नसून हिंगोली शहरातील रोड लगत असलेल्या पालामध्ये ज्ञानार्जन घेत असेल्या विद्यार्थ्यांची आहे. आज पर्यंत शासनाची कुठलीही योजना या विद्यार्थ्यापर्यंत पर्यंत पोहोचली नाही. या मुलांची कुठल्याही शाळेत नोंद सुद्धा नाही. या मुलांपर्यंत न सर्व शिक्षा अभियान, न कुठली शाळा, न कुठली योजना पोहोचली. आज घडीला जिकडे-तिकडे इंग्रजी शाळाचा सुळसुळाट झाला आहे. मराठी शाळांकडे कमी लक्ष देत इंग्रजी शाळेचे वारे वाहू लागले असताना या शाळा बाह्य मुलांना रोडलगत पाल ठोकून राहात असलेल्या मुलांना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. 'सारे शिकूया पुढे जाऊया' असे नारे लगावणारेशासन या भटक्या विमुक्त मुलांपर्यंत अजूनही पोहोचू शकले नाही ही शोकांतिकाच आहे.AM News Developed by Kalavati Technologies