उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा असीम सरोदे यांच्याकडून जाहीर निषेध

या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्यात आली असल्याची ते म्हणाले आहेत.

जालना | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा जाहीर निषेध करत विधीज्ञ असीम सरोदे यांनी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जालन्यात जाणीव अस्मितेची या परिषदेतर्फे पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी असीम सरोदे यांनी आपली परखड भूमिका मांडली. शिवसेनेचे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना मी फोन करून शपथविधी हा साधेपणाने घ्या असं सुचवलं होतं. मात्र त्यांनी असं न करता पैशांची उधळपट्टी करत शपथविधीचा कार्यक्रम घेतला. अशा शपथविधीचा यावेळी असीम सरोदे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

गुरुवारी मोठ्या थाटमाटात महाराष्ट्र विकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंचा शपथविधी पार पडला. दादर येथील शिवाजी पार्क येथे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती होती. शपथिवधी ऐतिहासिक ठरावा यासाठी शिवसेनेकडून प्रत्येक प्रयत्न करण्यात आले. मात्र यावर असीम सरोदे यांनी टीका केली आहे. या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्यात आली असल्याची ते म्हणाले आहेत. यासोबतच कमीत कमी दिवसाचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परिक्षेला असणार असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.AM News Developed by Kalavati Technologies