कौतुकास्पद...! सिल्लोडमध्ये अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने होमिओपेथी औषधांचे वाटप

या औषधीचे वाटप जवळपास 1000 नागरिकांना करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका आश्विनी पवार यांनी दिली आहे.

सिल्लोड | कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराने सर्वेत्र थैमान घातलं आहे. सिल्लोडमध्येही कोरोनाचे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘अर्सेनिक अल्बम 30’ या होमिओपेथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत असल्याचे नुकतेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या औषधाचे वितरण करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी सुद्धा मंजुरी दिली आहे. हीच बाब लक्षात घेता सिल्लोड येथील नगरसेविका आश्विनी पवार यांच्या संकलपनेतून एक उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग क्र 2 व 3 मधील नागरिकांना अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने होमिओपेथी औषधांचे वाटप करण्यात आले. सिल्लोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या हस्ते शनिवार दि. 30 में रोज़ी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून या उपक्रमाची औषधी औरंगाबादचे प्रसिद्ध डॉ. दिपक कुंकुलाल व डॉ. योगेश ठोंबरे यांनी निर्मित केली आहे. या औषधीचे वाटप जवळपास 1000 नागरिकांना करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका आश्विनी पवार यांनी दिली आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, पत्रकार सचिन चोबे, पो.कॉ. के.एम. भाग्यवंत, संस्थेचे अध्यक्ष किरण पा. पवार, शैलेष शिंदे, कृष्णा गजभारे, धनंजय खम्बाट, पंडित बोरडे, विजय चव्हाण, रामेश्वर घोडके यांची उपस्थिति होती. AM News Developed by Kalavati Technologies