सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर; ठाकरे पितापुत्राने राजीनामा द्यावा - निलेश राणे

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोजच नव-नवीन खुलासे, तसेच आरोप-प्रत्योरोप सुद्धा होत आहे. यातच आता माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, "सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे” अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आत्महत्या का केली याचा तपास करत असतांना बिहार पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आता या प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळू लागली आहे.AM News Developed by Kalavati Technologies