अभिनेत्री कंगना रणौतने उडवली खासदार संजय राऊतांची खिल्ली, ट्विट करत म्हणाली...

मुंबईतील वीज पुरवठ्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणावरून चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका करीत असते. नुकतचं कंगनाने एक ट्विट करत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने संजय राऊत यांची विशेष घेतलेली मुलाखत तसेच मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या निमित्ताने संजय राऊत आणि कुणालचा फोटो ट्वीट केला आहे.

त्यांत तिने लिहले आहे की, 'एकीकडे मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार अजूनही क क क...कंगना करत आहे' असे म्हणत कंगनानं संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे. कुणाल कामरा हा 'शट अप कुणाल' हा पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करत आहे. या पॉडकास्टची सुरुवात कुणालने संजय राऊत यांची मुलाखत घेऊन केली आहे. दरम्यान, कंगना नेहमीच शिवसेनेवर ट्विटर युद्ध करीत असते. आज सकाळी मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याची संधी पाहून आता कंगना आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies