अभिनेत्री दीपिका पादुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव आल्याने तिची आज एनसीबीकडून चौकशी होणार आहे

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण चौकशीसाठी आज एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले. त्यामध्ये दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सिंह याचे नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज ड्रग्स प्रकरणी एनसीबी दीपिकाची चौकशी करणार आहे. एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज दीपिका पादुकोणची चौकशी होणार आहे. तसेच शुक्रवारी रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान, रकुल प्रीत सिंहने ड्रग्सच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती असे सांगितले आहे. त्यामुळे आता दीपिकाची कसून चौकशी केली जाणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies