बच्चन कुटुंब कोरोनामुक्त! अभिषेक बच्चनचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मुुंबई | कोरोना संकटात बच्चन कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

11 जुलै रोजी बॉलिवूड महानायक म्हणून ओळखले जाणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान कोरोनामुक्त झाल्यानं अभिषेकने ट्विट करत “एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार”,अशा शब्दात आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies