'लाल सिंह चड्डा'च्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन अमृतसरच्या गोल्डन टेंबलमधे पोहोचला आमिर

आमिर खानने 'लाल सिंह चड्डा'मधील त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता.

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या आपल्या 'लाल सिंह चड्डा' सिनेमाच्या शूटिंगमध्य व्यस्त आहे. सध्या त्याने काही दिवसांपासून आपल्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये तो अमृतसरच्या गोल्डन टेंपल येथे गेला. स्वर्ण मंदिरामधून त्याचे काही फोटो समोर आले आहे. सुपरस्टार आमिर खानच्या या फोटोला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

फोटोमध्ये आमिर खानने पांढऱ्या रंगाचा स्कार्फ डोक्यावर बांधलेला आहे. आमिरचे हे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. काही काळापूर्वी आमिर खानने 'लाल सिंह चड्डा'मधील त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. या लूकमध्ये तो सरदार बनलेला दिसत होता. सोशल मीडियावर त्याच्या या लूकला चांगलीच पसंती मिळात आहे.AM News Developed by Kalavati Technologies