मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाउंटन हॉटेलच्या वाढीव बांधकामावर कारवाई

गेल्या अनेक वर्षांपासून या हॉटेलच्या वाढीव बांधकामाबाबत तक्रारी केल्या होत्या.

ठाणे । मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील फाउंटन हॉटेलच्या वाढीव बांधकामावर मीरा भाईंदर महापालिकेने तोडक कारवाई केली. सदर कारवाईत हॉटेलचे बेकायदा वाढीव बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. चार दिवसांपूर्वी रात्री स्थानिक गावकरी व फाऊंटन हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची पार्किंगच्या वादावरून हाणामारी झाली होती. याप्रकरणी हॉटेलचे कर्मचारी व गावकरी अशा दोघांवर परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण चिघळताच आज महापालिकेतर्फे हॉटेलच्या वाढीव भागावर कारवाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या हॉटेलच्या वाढीव बांधकामाबाबत तक्रारी केल्या होत्या. अखेर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हॉटेलचा अनधिकृत पार्किंगवर महापालिकेने कारवाई केली.AM News Developed by Kalavati Technologies