1 लाख भरून रिकामे होतील, त्यामुळे 'या' कायद्याचा काही उपयोग होणार नाही - देवेंद्र फडणवीस

त्यामुळे यापैकी कोणत्या शाळेला नियम पाळायचा नसल्यास ते 1 लाख भरून रिकामे होतील - देवेंद्र फडणवीस

मुंबई । आज विधानसभेने मराठी भाषेची सक्ती करण्याचा कायदा एकमताने संमत केला आहे. आमचे सरकार असतानाच आम्ही या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. या कायद्यामध्ये दोन तरतूदी अशा आहेत की, या कायद्यातूव कोणालाही सुट देता येईल.यात जी शाळा नियमांचे पालन करणार नाही त्यांना १ लाख रूपयाचा दंड देण्याची तरतूद केली आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई सारख्या ठिकाणी एका एका शाळेची फी ५-१० लाख असते. त्यामुळे यापैकी कोणत्या शाळेला नियम पाळायचा नसल्यास ते १ लाख भरून रिकामे होतील. त्यामुळे ह्या कायद्याचा काही उपयोग होणार नाही. जर मराठी भाषेसंदर्भातले आक्षेप सरकारने माण्य केले नाही तर मात्र हा कायदा कुचकामी होईल. त्यामुळे शासनाने याचा विचार केला पाहिजे. अस मत त्यांनी यावेळी मांडले.AM News Developed by Kalavati Technologies