आडमार्गाने राजस्थानला जाणाऱ्या गाडीला अपघात; दोन गंभीर

गुजरात राज्यात प्रवेश बंद असल्याने आडमार्गाने करत होते प्रवास

पालघर | राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात राज्यातील प्रवेश बंदी असताना आडमार्गाने राजस्थान गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चार चाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई दहिसर येथील वास्तव्य करणारे 10 कामगार भाड्याची गाडी करून राजस्थानकडे निघाले होते. दोन लहान मुलं, एका महिलेसह 10 प्रवासी कासा सायन - उधवा - वापी अशा आडमार्गाने जायच्या प्रयत्नात होते. या गाडीला सायवन सुकटआंबा परिसरात सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान झालेल्या अपघात दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies