पुणेकरांच्या आरोग्यासाठी "डॉक्टर आपल्यादारी" चा अनोखा उपक्रम

पुणे महानगरपालिका,फोर्स मोटार्स आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने डॉक्टर आपल्या दारी"च्या उपक्रमाला सुरूवात

पुणे | पुणे महानगरपालिका, फोर्स मोटार्स आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. पुणे मनपा हद्दीमधील नागरिकांचे आरोग्य तपासणीकरिता 11,मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनची तैनात करण्यात आल्या आहेत. या व्हॅनच्या मदतीने पुणे शहरात आरोग्य तपासणी उपक्रम "डॉक्टर आपल्या दारी" सुरूवात करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात आणि उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज सकाळी मनपा मुख्य भवनात करण्यात आले आहे. यावेळी माजी महापौर शेखर गायकवाड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, विलास राठोड, उपमहापौर सरस्वती शेडगे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शशिकांत मुनोत, अशोक पवारसह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरातील प्रत्येक वार्डात हे मोबाइल व्हॅनचे पथक जाणार आहे. यापथकामध्ये 1 डॉक्टर 1 नर्स 1 कंम्पाउंडर आणि 2 सहाय्यक असणार आहे. त्यांच्याद्वारे प्रत्येक नागरिकांची सर्दी खोकल्याची तपासणी होणार आहे तसेच त्यावर औषध उपचार आणि गोळ्या सुद्धा देण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान रुग्णात काही जास्त लक्षणे आढळली तर अशा रुग्णाला नायडू हॉस्पिटल मध्ये पाठवणार आहे. दररोज सकाळी 10 ते 5 या वेळेत हे मोबाइल व्हॅन पथक तपासणी करणार आहे. 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण पुणे शहरात हे पथक तपासणी करणार असल्याची माहिती पथकाचे प्रमुख विलास राठोड यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies