जागतिक आरोग्य संघटनेचे पथक सांगलीत दाखल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील...

जिल्ह्यातील एकूण दहा ठिकाणी हे पथक जाणार

सांगली | सांगली जिल्ह्यात जागतिक आरोग्य संघटना दिल्लीची समिती दाखल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण दहा ठिकाणी हे पथक जाणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील ८० तसेच सांगली जिल्ह्यातील ४०० नागरिकांच्या रक्ताचे नमुने चेन्नईला पाठविण्याचे काम सुरु असल्याची माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ वैद्यकीय आदित्य बेंगले यांनी दिली.

सांगली शहरातील अभयनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद दिल्लीच्या दहा जणांची टीम आज दाखल झाली. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ व १८ मधील ८० तर सांगली जिल्ह्यातून ४०० नागरिकांच्या रक्ताचे नमुने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेऊन ते तपासणी करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च संस्था चेन्नईला पाठविण्यात आल्याची माहिती संस्थेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आदित्य बेंगाले यांनी दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआर या संस्थेतर्फे भारतीय समुदायामध्ये कोरोना विषाणूंच्या प्रसाराच्या कक्षा समजून घेणे आणि सार्स कोरोना संक्रमणाचा कल जाणून घेणे त्याच बरोबर इथल्या नागरिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती किती आहे याची माहिती घेण्यासाठी हे सर्व्हेक्षण महापालिका क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात केला जात आहे. सार्स - यामुळे होणार कोरोना विषाणू आजार हा एक नवीन संक्रमित आजार आहे. जो या आधी कुठेही आढळला नव्हता.

या सर्व्हेक्षणाचा उद्देश हा कोरोना विषाणूचा विविध भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रसार किती होऊ शकतो व त्यांची प्रतिकारक शक्ती किती आहे? याची माहिती संकलित करणे हा आहे. या बाबत सांगली महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र अभयनगर येथे जागतिक आरोग्य संघटने अंतर्गत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद दिल्लीच्या दहा जणांचे पथक दाखल झाले असून महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ व मिरजेतील प्रभाग क्रमांक १८ मधील ८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने तसेच जिल्ह्यातील काही गावांमधील ४०० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे काम सध्या सुरु आहे. या सर्व नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च सेंटर चेन्नई इथे पाठवण्यात येत आहेत. यावेळी आयसीएमआरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आदित्य बेंगले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सौ. संजीवनी घाडगे यांच्यासह वैद्यकीय केंद्राचा स्टाफ उपस्थित होता.AM News Developed by Kalavati Technologies