गोंदियात वीज पडून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, तर चार महिला गंभीर जखमी

रोवणीचे काम करीत असताना शेतात अंगावर वीज पडून एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घटना गोंदियात घडली आहे

गोंदिया | रोवणीचे काम करीत असताना शेतात अंगावर वीज पडून एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या धामणगावात घडली आहे. या घटनेत एका 20 वर्षीय विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर अन्य चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मृत झालेली मुलगी पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी होती. तर जखमी चार जण गावातील असून त्यात जखमी मध्ये मुलीची आई आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आठवड्याच्या विश्रांतीनंतर दुपारी विजेच्या गडगडाट सह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशातच तालुक्यातील धामणगाव येथील माजी पोलीस पाटील सुखदेव गायधने यांच्या शेतात रोवणी च्या कामात व्यस्त असलेल्या महिलांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्या ने एक २० वर्षीय मुलगी जागीच ठार झाली. पूजा पुरुषोत्तम राठोड असे मृत मुलीचे नाव आहे. तर सुशीला उत्तमसिंग पवार वय ५५ वर्षे, उर्मिला भरतलाल ठाकरे वय ६० वर्ष, शोभा संतोष मेश्राम वय ४० वर्ष व मुलीची आई कांताबाई राठोड वय ४० वर्ष असे जखमी झालेल्या महिलांची नाव असून यापैकी दोन महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन्य दोन महिलांना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस व नायब तहसीलदार, तलाठी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत मुलीची घरची परिस्थिती हलाखीची असून ती पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. लॉकडाउनच्या काळात कॉलेज बंद असल्याने घरी हातभार होईल या उद्देशाने आपल्या आईसोबत रोवणीच्या कामाला सोबत जात असे, परंतु आज घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies