मुंबईत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

6 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे

मुंबई ।मुंबईत एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईतील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या एखा रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 6 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies