उशीरा दार उघडल्याच्या कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या

संत रोहिदास नगर परिसरातील घटना, आरोपी अटकेत

ठाणे | उशिरा दार उघडल्याच्या कारणावरून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिनेशकुमार गुप्ता असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. याप्रकरणात पोलीसांनी आरोपी रामजित विश्वकर्मा याला अटक केली आहे. संत रोहिदास नगर परिसरात आरोपी रामजित विश्वकर्मा आणि मयत दिनेशकुमार गुप्ता हे दोघंही मित्र एकत्र राहत होते. मयत दिनेश कुमार गुप्ता नेहमी कामावरून घरी उशिरा येत होता. उशीरा आल्याने रामजित विश्वकर्मा याची झोपमोड होत होती. याच गोष्टीचा राग रामजित विश्वकर्मा मनात बाळगूण होता. मध्यरात्रीच्या सुमारास दिनेशकुमार गुप्ता घरी उशिरा आला होता. दरवाजा उशिरा उघडला म्हणून दोघात जोरदार भांडण झाले. त्यात आरोपी रामजित विश्वकर्मा याने जाडसर हत्याराने दिनेश कुमार गुप्ता याच्या डोक्यात प्रहार करून पळ काढला होता.

दुसऱ्या दिवशी दिनेश कुमार गुप्ता कामावर आला नाही म्हणून कंपनीतले त्याचे मित्र घरी आले असता त्यांना दिनेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून बॉडी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली. दिनेशचा खुन झाल्याची माहिती पोलिसांकडे होती. पोलीसांनी तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही तासातच आरोपी रामजित विश्वकर्मा याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक आर पी बयेस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies