भाजपा खासदार रामदास तडस आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांच्यांवर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्ध्यातील देवळीत पाण्याच्या पाईपलाईन वरून झाला होता वाद; तडसवर 1 तर काकडेंवर 2 गुन्ह्यांची नोेंद

वर्धा । वर्ध्यातील देवळीत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना भाजप खासदार रामदास तडस आणि शेतकरी आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे या दोघात चांगलाच वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी देवळी पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून खासदार रामदास तडस यांच्यावर एक तर अशोक काकडे विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवळी इथे नगरपालिका, जीवन प्राधिकरणाच्या पिण्याच्या पाण्याकरीता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी काम सुरू असताना यावरून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. त्यावरून अशोक काकडे आणि खासदार रामदास तडस यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला. या वादाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जागा स्वमालकीची असल्याचा दावा अशोक काकडे यांनी केला आहे.

घटनेच्यावेळी तडस यांनी दगड मारल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. तर तडस यांनी ही मिरननाथ मंदिराच्या यात्रेसाठी असणारी जागा, शासकीय जागा आहे. येथे अनेक वर्षांपासून रोड असल्याचा खासदार तडस यांनी सांगितले आहे. एवढच नव्हे तर तडस यांनी काकडेने शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
दोघांनीही एकमेकांविरोधात देवळी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या. त्यावरून काकडे यांच्या तक्रारीवरून खासदार तडस विरोधात कलम 336, 294, 504, 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर काकडे विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तडस यांची तक्रारीवरून कलम 294 भादवी आणि नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कलम 187,188 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies