जल्लोष पडला महागात, अकिल शेख सह 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनावर मात करून परतल्यावर नागरिकांनी केला जल्लोष

वैजापूर । वैजापूर येथील माजी उपनगराध्यक्ष तसेच वैजापूर विधानसभा मतदार संघातुन बाद झालेले, शेख अकिल यांनी कोरोनावर मात केली असुन, घरी परतल्यानंतर नागरिकांनी, तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. कोरोनामुळे सोशल डिस्टसींग पाळणे हे बंधनकारक आहे, तसेच गर्दी करु नये असे प्रशासन वारंवार सांगुनही, वैजापूरमध्ये नियम तोडण्यात आले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकिल शेख सह आणखी 100 ते 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies