8 लाख भारतीयांना सोडावे लागणार कुवेत

कुवेतमध्ये विधेयकाला मिळाली मंजुरी, कामासाठी गेलेल्यांची वाढली चिंता

दिल्ली । कोरोनामुळे आलेला आर्थिक संकट, आणि वाढत चाललेली बेरोजगारीमुळे कुवेत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेत सरकारने केली आहे. त्यामुळे कुवेतमधील विदेशी कामगारांच्या संख्येत कपात होणार हे नक्की! या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाली असून हा मसुदा पूर्णपणे घटनेला धरुन आहे, असे विधेयक समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयक कुवेतमध्ये मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.

कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विधेयक मंजुर झाल्यास भारतातील 7 ते 8 लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे. कुवेतमध्ये विदेशी कामगारांमध्ये भारतीयांची संख्य़ा सर्वाधिक आहे. कुवेतची एकूण लोकसंख्या ही 43 लाख आहे, त्यापैकी 30 लाख हे विदेशी प्रवासी आहे. यात भारतीयांची संख्या 14.3 लाख आहे. आता यात 15 टक्के कोटा निश्चित झाल्यावर भारतीयांची संख्या साडेसहा ते सात लाख एवढी मर्यादित होईल.AM News Developed by Kalavati Technologies