मुंबई | विक्रोळीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज टागोरनगर परिसरात 55 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिलेवर सध्या गोदरेज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे एकूणच विक्रोळी मधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 5 वर पोचली आहे. कोरोनाची लागण आढळलेल्या सदरील महिलेच्या कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या परिसरात भितीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने आजूबाजूचा संपूर्ण परिसर सील केला आहे.
विक्रोळीत 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या 5 वर
सदरील महिलेच्या कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात येणार आहे
