व्हिडीओ : शस्त्रक्रिया करुन गायीच्या पोटातून काढले 52 किलो प्लास्टिक

या गायीवर साडेपाच तास सुरु होती शस्त्रक्रिया

नवी दिल्ली । तामिळनाडूमधील डॉक्टरांनी एका गाईवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातून चक्क 52 किलो प्लास्टिक बाहेर काढलं आहे. या गायीवर डॉक्टरांनी पाच तास शस्त्रक्रिया केली. पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया करण्यात आलेली गाय मागील अनेक दिवसांपासून आपला पाय पोटावर मारायची. हळूहळू या गायीचे दूधही कमी होऊ लागल्याचे गायीचे मालक असणाऱ्या पी मुनीरत्नम यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या गायीला पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या गायीच्या पोटातून 52 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलं.

AM News Developed by Kalavati Technologies