बुलढाणा जिल्ह्यात 45 वर्षीय दिव्यांग महीलेवर अतिप्रसंग करून हत्या

महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

बुलढाणा । हैदराबादची घटना ताजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वासनांध नराधमांनी एका युवतीस निर्वस्त्र अवस्थेत फेकून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे आज सकाळच्या सुमारास एका दिव्यांग अविवाहित 45 वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सदर महिला ही खेर्डा येथील मेंढपाळ असून तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सदर महिलेची दि 7 डिसेंबरच्या रात्री हत्या करून प्रेत निवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन डाँग स्काँट व फाँरेंसीक लँब एक्सपर्ट आल्यानंतर कुत्रा संशयीताच्या घरात गेला. पुढील तपास एस पी साहेबांनच्या मार्गदर्शनात सुरु आहेAM News Developed by Kalavati Technologies