आगीमुळे दिल्लीत 43 ठार, केजरीवाल सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर

भाजपाकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, जखमींना प्रत्येकी 25 हजारांची मदत

नवी दिल्ली | दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची 27 वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरूच आहे. अशातच दिल्ली सरकारकडून मदत जाहीर झाली आहे. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत मिळणार आहे. तर जखमींना प्रत्येकी 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आले आहे. तर जखमींना प्रत्येकी 25 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या मदतीची घोषणा खासदार मनोज तिवारींचीर यांनी केली आहे.

आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. परिसरातील लोकांचे पुनरुत्थान केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीटद्वारे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि अनुराग ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि मृतांच्या कुटुंबियांना 5 ते 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. धान्याच्या बाजारात एका इमारतीला आग लागली. ही आग इतकी भयानक होती की 30 हून अधिक अग्निशामक यंत्रणा आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाल्या. मात्र, आग पाहिल्यानंतर ती वाढतच गेली.AM News Developed by Kalavati Technologies