जालन्यात परराज्यातील कामगारांसाठी 42 कॅम्प, 2 हजार 754 कामगारांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था

कामगारांसाठी 42 कॅम्प लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे

जालना | कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे देशात संचारबंदी लागू केली असतांना अनेक कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले आहे. परिणाम परराज्यातून आलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगार पायीच आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाले आहे. मात्र जालना जिल्ह्यात असलेल्या अशा कामगारांसाठी 42 कॅम्प लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे.

या 42 कॅम्पमध्ये 2 हजार 754 मजुरांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं या मजुरांची दोन वेळच्या जेवनाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कामगारांनी इकडे तिकडे न जाता जिल्ह्यातच थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies