विधानसभेला विदर्भवादी पक्ष लढवणार 40 जागा, विदर्भ निर्माण महामंचचा निर्णय

या महासंघात विदर्भ राज्य आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पक्षासह सध्याच्या घडीला 5 विदर्भवादी संघटनांचा समावेश आहे

नागपूर | स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवादी संघटना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील 40 जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या विविध संघटनांचा महासंघ असलेला 'विदर्भ निर्माण महामंच' च्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाणार आहे.

या महासंघात विदर्भ राज्य आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रीय जनसुराज्य पक्षासह सध्याच्या घडीला 5 विदर्भवादी संघटनांचा समावेश आहे. येत्या काळात या महासंघात आणखी विदर्भवादी पक्ष सामील होणार असल्याची माहिती विदर्भ राज्य महामंचच्या वतीने देन्यात आली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विदर्भवादी निवडणूक लढणार असून कुठल्या मतदार संघातून कोणते उमेदवार निवडणूक लढतील यावर लवकरच चर्चा होऊन उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील अनेक मतदार संघात विदर्भवाद्यांनी उमेदवार उभे केले होते परंतु विदर्भवादी उमेदवारांना एकही लोकसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नव्हते हे विशेष.AM News Developed by Kalavati Technologies