बुलडाण्यात आतापर्यंत 4 रुग्ण कोरोना बाधित, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बुलडाण्यातील आठ जणांचे कोरोना संबधित रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत

बुलडाणा | कोरोना व्हायरसमुळे भीती निर्माण झालेल्या नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी आहे. बुलडाण्यातील आठ जणांचे कोरोना संबधित रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या रिपोर्टकडे प्रशासनासह सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून होते. या आठही रुग्णांचे रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी एक रुग्ण बाधित आढळला होता. हा रुग्ण ज्या परिसरात राहत होता त्या परिसराला सील करण्यात आले असून तेथे निर्जंतुकीकरण देखील करण्यात आलं आहे. तर बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची नोंद करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. या सहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे रिपोर्ट अजून प्राप्त झाले नाहीत. बुलडाण्यात आतापर्यंत चार रुग्ण कोरोना बाधित आढळले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांवर सध्या उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies