पालघरमध्ये कोरोनाचे 332 नवे रुग्ण, दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आजवर 366 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

पालघर | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतांना दिसत आहे. आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 332 नव्या रुग्णांची वाढ झालीय. तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 178 रुग्णांचा समावेश आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 18 हजार 270 वर पोहचला असून आजवर 366 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 896 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून 14 हजार 08 रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies