जळगावात आज 30 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगावमध्ये दिवसभरात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आज दिवसभरात 30 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 522 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले असून यामध्ये 30 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. सतत रुग्णांच्या संखेत वाढ होत असल्यानं जळगावकरांची चिंता आणखीच वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 60 जणांचा बळी घेतला असून 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies