पोलीस कोठडीत ३ आरोपींना कोरोनाची लागण, लक्षणे नसतांनाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

संपर्कातील इतर पोलिसांचेही विलगीकरण

उल्हासनगर । विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हेगारांना पोलिस कोठडीतच कोरोनाची लागण झाली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी कॅम्प चार येथील आत्माराम नगरमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकत खंडणी मागितली होती.
विठ्ठलवाडी पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत वेळेतच यातील सर्व गुन्हेगारांना गजाआड केलं आहे. या सगळ्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र पोलीस कोठडीत असतांना या आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणतेही लक्षणे नसतांनाही त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या तीनही आरोपींना कोव्हिडं रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या गुन्हेगारांच्या संपर्कातील इतर पोलिसांनाही विलगीकरण करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies