एसआरपीएफच्या २९ जवानांना कोरोनाची लागण

धुळेवरून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

गडचिरोली । पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळेवरून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ही दीडशे जवानांची तुकडी मागील आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. यातील 29 पॉझिटिव्ह तर इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे 72, राज्य राखीव दलाचे 29, सीमा सुरक्षा दलाचे 2 असे मिळून 103 जवान कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

हेही वाचा : कोविड व्यतिरिक्त कॅन्सर आणि किडनीसारख्या अन्य रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर..AM News Developed by Kalavati Technologies