कल्याण डोंबिवलीत दिवसभरात 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आज एका 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज 29 रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच एका 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील आहे. त्यामुळं परिसरात मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या आता 27 इतकी झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण पश्चिमेत 1 रुग्ण, कल्याण पूर्वेत 12 रुग्ण, डोंबिवली पश्चिमेत 3 रुग्ण, डोंबिवली पूर्वेत 11 रुग्ण, तर प्रत्येकी 1 - 1 रुग्ण ठाकुर्ली चोळेगाव आणि आंबिवलीमध्ये आढळून आला आहे. आजच्या या रुग्णांमुळं कोरोनाग्रस्ताचा आकडा 911 वर गेला असून आतापर्यंत 297 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या 587 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies