पालघरमध्ये आज कोरोनाचे 263 नवे रुग्ण, दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 327 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे.

पालघर | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 263 नव्या रुग्णांची वाढ झालीय. तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 109 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 16 हजार 713 वर पोहचला असून आजवर 327 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 414 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 12 हजार 972 रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत. 



AM News Developed by Kalavati Technologies