पालघर जिल्ह्यात कोरोनाचे 257 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 257 नवीन रुग्णांची नोंद

पालघर | जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून बुधवारी दिवसभरात 257 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 37 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येचा आकडा आता 5 हजार 239 वर पोहचला असून आजवर 134 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 542 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आजवर 2 हजार 563 रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies