कन्नड तालुक्यातील सुमारे 25 जिल्हा परिषद शाळांना लागणार टाळे

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे ओढवणार परिस्थिती

औरंगाबाद | कन्नड तालुक्याती जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी झाल्याने सुमारे 25 जिल्हा परिषद शाळाना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थीती ओढवणार आहे. यामुळे विदयार्थीच्या रिकाम्या मैदानावर शेजाऱ्यांनी डल्ला मारून वाळु,विटा,माती,दगड कुनाला न विचारता मैदानावर साठवणुक केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

अतिरीक्त गटशिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी पदभार घेतला. परंतु त्या केव्हा तरी आल्याने तालुक्यात शिक्षणाचा घोळ होतांनी दिसत आहे. 2019 मध्ये पटसंख्या कमी झाल्याने दोन नियमीत शाळासह नऊ शाळा बंद पडल्या. 2020 मध्ये पटसंख्या अभावी पंचविस शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शहरातील शिक्षण संस्थेचे चांगभले होतांना दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies