उल्हासनगरमध्ये आज दिवसभरात 25 पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

आतापर्यंत 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबई | उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज मराठा सेक्शन मधील एका 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 191 इतका झाला आहे. दर दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे. शहरातील सम्राट अशोकनगर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. आजच्या 25 रुग्णांपैकी 13 रुग्ण सम्राट अशोक नगर परिसरात आढळून आले आहे. इतर रुग्णांमधील आंबेडकरनगर 4 रुग्ण, उल्हासनगर 2 रुग्ण, तर सी ब्लॉक, कुर्ला कैम्प, शास्त्रीनगर परिसरातील प्रत्येकी 1 - 1 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. अजूनही 124 रुग्णांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies