पालघरमध्ये आज कोरोनाचे 248 नवे रुग्ण, दिवसभरात आठ जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे

पालघर | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 248 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील 37 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 8 हजार 651 वर पोहचला असून आजवर 162 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 051 कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर 5 हजार 438 कोरोनाबाधित रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies