सांगली जिल्हा कारागृहात; आणखी 22 कैदयांना कोरोनाची लागण

सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

सांगली । सांगली जिल्हा कारागृह कैद्यांनी हाऊसफुल्ल असून, त्यातच आता कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यात 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सांगली कारागृहात एकूण 85 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या 85 पैकी 82 कैद्याना कोरोना झाला आहे. आता कोरोनाबाधित कैदयांना सांगलीतील एका महाविद्यालयातील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

सांगली जिल्हा कारागृह हे कैदयांनी पुर्णत: भरलेले आहे. कारागृहात 205 पुरूष तर, 30 महिला अशा 235 बंदी ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र कैद्यांची संख्या वाढत गेली आणि त्यातच गेल्या कित्येक महिन्यात जामिनावरील सुनावणी न झाल्याने हे कारागृह ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या कारागृहात एकूण 319 बंदी आहेत. त्यामध्ये 295 पुरूष आणि 24 महिलांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने आलेल्या पन्नास कैदयांना कारागृहा शेजारील एका शाळेत ठेवण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी कारागृहात कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर 63 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र चाचणी झाल्यानंतर एका बंद्याची जामिनावर सुटका झाली आहे. पण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो लिंब (ता. तासगाव) येथील असून त्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यांनतर आता 22 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे 82 कैदी आणि 3 कर्मचारी असे एकूण 85 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies