निर्भया प्रकरण : दोषी पवनची याचिका फेटाळली, पण अजूनही टाळली जाऊ शकते फाशी

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळली

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा पवनने आपल्या अर्जामध्ये केला होता. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळली आहे. मात्र ही याचिका फेटाळली असली तरीही अजूनही दोषींकडे फाशी टाळण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हा एकमताने दोषी पवनची क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळून लावली. दोषी पवनच्या याचिकेवर सकाळी 10.25 मिनिटांनी सुनावणी सुरू करण्यात आली होती. क्युरेटिव्ह पिटिशनवर बंद दाराआड सुनावणी केली जाते. यानुसार ही सुनावणी पार पडली.

पवनकडे अजून एक पर्याय
पवन कुमार हा एकमेव दोषी आहे ज्याच्याकडे कायदेशीर पर्याय शिल्लक आहे. यामध्ये त्याचा क्युरेटिव्ह पिटिशन आता फेटाळण्यात आले आहे. त्याच्याजवळ आता दया याचिकेचा पर्याय शिल्लक आहे. पवनसाठी वकील एपी सिंह म्हणाले की, आता आम्ही राष्ट्रपतींजवळ दया याचिका दाखल करणार आहोत. यामुळे त्याची फाशी टाळता येऊ शकते.AM News Developed by Kalavati Technologies