नदीत बुडून 2 युवकांचा मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने युवक बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज

जळगाव | मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील महलगुलारा येथील उतावळी नदीमध्ये 2 युवकांचा बुडून मृत्यु झाला असून तब्बल सहा तासानंतर या युवकांचे मृतदेह सापडले आहेत. मृत युवकांमधील एकाचे नाव समीर असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील सेफकुवा येथील रहिवासी होता तर दुसऱ्या युवकाचे नाव रेहान असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील बुधवाडा ग्रामचा रहिवासी होता.

मागील सहा तासांपासून प्रशासन या दोन्ही युवकांचा शोध घेत होते. अखेर या दोघांचे ही मृतदेह सापडले आहेत. मित्रांसोबत हे युवक नदीचा पूर पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. तसेच याठिकाणी या युवकांनी सेल्फी देखील काढला. अखेर हा सेल्फी त्यांचा अखेरचा सेल्फी ठरला. नदीत पोहण्यासाठी हे युवक पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवक बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies