महाराष्ट्रात कोरोनाचे 2 हजार 598 नवे रुग्ण, दिवसभरात 85 जणांचा मृत्यू

मृत झालेल्या रुग्णांमध्ये 60 पुरुष आणि 25 महिला आहेत.

मुंबई | महाराष्ट्रात आज कोरोनाचे 2 हजार 598 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 हजार 546 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 698 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 18 हजार 616 रुग्ण कोरोनापासून बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. दरम्यान आज दिसभरात 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई 38, पुणे 10, सातारा 9, सोलापूर मनपा 7, अकोला मनपा 5, वसई विरार 4, ठाणे 4, औरंगाबाद 3, नवी मुंबई 2, तर रायगड, जळगाव, आणि नांदेडमधील प्रत्येकी 1 - 1 रुग्णांचा समावेश आहे.

मृत झालेल्या रुग्णांमध्ये 60 पुरुष आणि 25 महिला आहेत. यामुळे राज्यातील मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 1982 इतका झाला आहे. राज्यात कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 31.26 टक्के इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.32 टक्क्यांवर असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये असून 35 हजार 122 लोक संस्थांत्मक क्वॉरंटाइनमध्ये आहे.AM News Developed by Kalavati Technologies