महाराष्ट्रात 2 हजार 259 नवीन रुग्णांची नोंद, दिवसभरात 120 मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या 90 हजारांच्या पार

महाराष्ट्रात आज कोरोनाचे तब्बल 2 हजार 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

मुंबई | महाराष्ट्रात आज कोरोनाचे तब्बल 2 हजार 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 90 हजार 787 झाली आहे. आत्तापर्यंत 42 हजार 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 44 हजार 849 रुग्णांवर सद्यस्थितीला उपचार सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 289 झाली असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आज राज्यात 1 हजार 663 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या 42 हजार 638 इतकी झाली आहे.

राज्यात सध्याच्या घडीला 44 हजार 849 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 46.96 टक्क्यांवर पोहचले आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 3.6 टक्के इतका आहे. दरम्यान आज झालेल्या 120 मृत्यूंमध्ये 80 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची संख्या 62 होती. तर 47 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील होते. तसेच 11 रुग्णांचे वय हे 40 वर्षांखालील होते. आजवर पाठवण्यात आलेल्या 5 लाख 77 हजार 819 नमुन्यांपैकी 90 हजार 787 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 68 हजार 73 रुग्ण होम क्वॉरंटाइन असून 23 हजार 470 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.AM News Developed by Kalavati Technologies