सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार, नांदेडमधील घटना

एक महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि दोषी शिक्षक व त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले.

नांदेड | जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार शिक्षकांनी शाळेतच लैंगिक अत्याचार केले. शिक्षण क्षेत्रालाच नव्हे तर माणुसकीलाही काळिमा फासणारी ही घटना आहे. मुलीने घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने मुख्याध्यापकांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र, अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांच्या हवाली करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी पीडित मुलीच्या आईकडूनच याविषयी कोणालाही न बोलण्याचे शपथपत्र लिहून घेतले. एक महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि दोषी शिक्षक व त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले.

पीडित विद्यार्थिनी साईबाबा विद्यालयामध्ये शिक्षण घेते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 50 किलो मीटरच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओही दाखवल्याचे समोर आले आहे. घडलेल्या सर्व प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies