कल्याण डोंबिवलीत उद्यापासुन 185 खाटांचे रुग्णालय सुरू होणार, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता 185 बेडचे एक रुग्णालय उभारण्यात आले आहे

ठाणे | कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेले पाहायला मिळत आहे. रोज 400 ते 500 च्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी कडून एक जम्बो सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात डोंबिवलीतील केडीएमसीचे सावळाराम क्रीडा संकुल येथे कोविडसाठी 185 बेडचे एक रुग्णालय उभारण्यात आल आहे. उद्यापासून हे रुग्णालय रुग्णांसाठी उपलब्ध होणार असून आज या रुग्णालयाच्या पाहणीसाठी केडीएमसी आयुक्त, केडीएसी महापौर, कल्याण लोकसभेचे खासदार यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडा संकुलात 155 ऑक्सिजन आणि 30 आयसीयू व्हेंटिलेटर खाटा असलेले रुग्णालय उद्यापासून सुरू केले जाणार आहे.

मोठ्या रुग्णालयात देखील नसलेल्या सुविधा याठिकाणी दिल्या जाणार आहेत. याशिवाय 4 दिवसात डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे 200 ऑक्सिजन, जीमखण्यात तसेच कल्याण पश्चिमेत 500 खाटांचे अशा ऐकून 1000 खाटा पेक्षा जास्त क्षमतेची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्यामुळे रुग्णांना खाटासाठी फिरावे लागणार नाही. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली असून तज्ञ डॉक्तराची फौज याठिकाणी रुग्णाच्या सेवेसाठी आमच्या बरोबर सज्ज झाली आहे असे सांगितले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना खाटा मिळाव्यात यासाठी जम्बो सुविधा करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. यासाठी शासनाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे पूर्णपणे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय तयार करणे शक्य झाले असून बंदीस्त क्रीडासंकुलातील या रुग्णालयात उद्यापासून रुग्णांना सेवा दिली जाईल याखेरीज 15 जुलै पासून 400 आयसीयू आणि 1000 ऑक्सिजनची सुविधा असलेले रुग्णालय सुरू केले जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी घाबरू नका, टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून पुढील काळात आणखी टेस्टिंग वाढणार आहेत. यामुळे रुग्ण वाढतील मात्र त्याच्यासाठी सुविधा कमी पडणार नाहीत.

नॉन कोव्हीड रुग्णासाठी शहरातील सर्व रुग्णलाय सुरू ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या असून काही अपवाद आहेत. यामुळे या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईंग स्क्वाड तयार करण्यात आले आहे. तर जास्त बिलाच्या तक्रारीसाठी आयएमएच्या पदाधिकार्या बरोबर बैठक घेत रुग्णालयाना शासनाच्या नियमानुसार बिल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रुग्णाच्या स्वॅब टेस्टिंगचे अहवाल 24 तासात देण्याचे निर्बंध लॅब ना घालण्यात आले आहेत. तर रुग्णाच्या अति जवळच्या नातेवाईकांनी स्वॅब टेस्टिंग ची घाई करु नये 5 दिवसात त्याच्या टेस्ट ची व्यवस्था केली जाईल असे आवाहन केडीएसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी नागरिकांना केले.AM News Developed by Kalavati Technologies