राज्यात गेल्या 24 तासात 18,390 कोरोनाबाधितांची भर; तर 392 जणांचा मृत्यू

राज्यात सध्या 2,72,410 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 लाखांच्या पार गेला आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 18 हजार 390 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 12 लाख 42 हजार 770 एवढा झाला आहे. सध्या राज्यातील विविध भागात 2 लाख 72 हजार 410 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 33 हजार 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 9 लाख 36 हजार 554 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 56 लाखांच्या पार गेला आहे. तर सुमारे 90 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमाकांवर असून महाराष्ट्र 12 लाख 42 हजार 770 कोरोना केसेस आढळल्या आहेत. त्यापाठोपोठ आंध्र प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमाकांवर असून, तिथे 6 लाख 31 हजार 749 कोरोना केसेस आढळले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies