पालघर जिल्ह्यात आज तब्बल 179 कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येने ओलांडला 8 हजारांचा टप्पा

पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा झपाट्यानं वाढत आहे

पालघर | जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ८ हजारांहून अधिक झाली आहे. ही पालघरकरांसाठी चिंताजनक बाब बनलीय. जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात १७९ नवीन रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येचा आकडा आता ८ हजार १४१ वर पोहचला असून आजवर १४९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ३ हजार २९६ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु असून आजवर ४ हजार ६९६ रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies